शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रुपया न देता पारदर्शी पद्धतीने राज्यात शिक्षक भरती : तावडे शिक्षक दिन कार्यक्रम; राम कदम यांच्या विषयावर उद्या बोलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:51 IST

आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सातारा : ‘आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. दरम्यान, यावेळी त्यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर आज शिक्षक दिन आहे, यावर उद्या बोलू, असे सांगून विषयावरच पडदा टाकला.

सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहातील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी घाटकोपरचे आमदार राम कदम यांच्या महिलांच्या बाबतीतील आक्षेपार्ह वक्तव्याचा राजकीय छळवाद शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनुभवला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा आधी घेराव त्यानंतर प्रसारमाध्यमांकडून झालेली विचारणा यामुळे तावडेंना खूपच सारवासारव करावी लागली. ‘आज शिक्षक दिन आहे, त्यामुळे कदमांच्या विषयावर उद्या बोलू,’ असे सांगत शिक्षणमंत्र्यांनी आपली सुटका करून घेतली.

यावेळी मंत्री तावडे म्हणाले, ‘अनुदानित संस्थांचा अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्था, समाजकल्याण, आदिवासी प्रकल्प विभाग व खासगी शिक्षण संस्थांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. राज्यात जे दोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेतात ती पिढी देशाच्या रचनेत मोठा हातभार लावणार आहे. म्हणून आजचे तब्बल १०६ पुरस्कार राज्यातील तमाम पाच लाख शिक्षकांना समर्पित आहेत.ज्या शिक्षण संस्थांना कागदावरच अनुदान मिळत होते. त्यांना २० टक्के अनुदान देण्याची भूमिका शासनाने गेल्या दोन वर्षांत घेतली आहे. कायम विनाअनुदानितचा कायम शब्द हटविल्यानंतर अनुदान देण्याचा निर्णय झाला.

राज्यातील शिक्षक भरतीच्या संदर्भात छेडले असता विनोद तावडे म्हणाले, ‘जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, समाजकल्याण व आदिवासी कल्याण विभागाची भरती प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल. त्यासंदर्भात भरती फॉर्म अपलोड करण्याचे काम सुरू आहे. काही अनुदानित खासगी शिक्षण संस्था कोर्टात गेल्या. मात्र, आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे.साताऱ्यातील शिक्षक बदलीचा प्रश्न...सातारा जिल्ह्यात झालेल्या बदल्यांमध्ये काही शिक्षकांवर चुकीच्या पद्धतीने आरोप झाले. याकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ग्रामविकास मंत्र्यांच्या अखत्यारितीतील ही बाब आहे. त्यावर मंत्री पंकजा मुंडे योग्य निर्णय घेतील,’ असे सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTeachers Dayशिक्षक दिन